JavaScript top interview questions and answer in marathi for freshers as well as experienced developers.
Questions (click on questions to read answer):
१) What are the different data types present in javaScript?
१) String: स्ट्रिंग म्हणजे एक अक्षरांचा समुह असतो थोडक्यात सांगायचे ठरले तर String म्हणजे शब्द, स्ट्रिंग आपण डबल किंवा सिंगल कोट मध्ये लिहतो.
Ex: १) “I Love India” २) var name = “john”
२)Numbers: JavaScript मध्ये ज्यावेळेस तुम्हाला ० ते ९ पर्यंत संख्या वापरायची असते त्या वेळेस आपण Number हा डेटा टाईप वापरतो. इतर प्रोग्रामिंग भाषेप्रमाणे तुम्हाला इथे int, float हे वापरायची गरज नाही आहे.
Ex: १) let a = 5; २) let b = 156e5;
३)Boolean: हा डेटा टाईप आपण true किंवा false व्हॅल्यू सेट करण्यासाठी वापरतो, थोडक्यात आपण Boolean डेटा टाईप वापरून आपल्या जावास्क्रिप्ट प्रोग्रॅम मध्ये कंडिशन वापरू शकतो.
Ex: १) let isClicked = true;
if(isClicked){
// your code
}
४)Undefined: JavaScript मधील हा एक महत्वाचा डेटा टाईप आहे, ज्यावेळेस आपण एखादा व्हेरिएबल डिकलेअर करतो परंतु त्याला कोणतीही व्हॅल्यु assign करत नाही, त्यावेळेस त्या व्हेरिएबलची डिफॉल्ट व्हॅल्यु हि Undefined असते.
Ex: let variable = undefined;
// or
let x;
५)Null: ज्यावेळेस आपण एखाद्या व्हेरिएबलला जाणीवपुर्वक काही व्हॅल्यु assign करायची नसते, त्यावेळेस आपण त्या व्हेरिएबलला Null व्हॅल्यु assign
करतो.
६) Objects : Objects हे जावास्क्रिप्ट मधील सर्वात महत्वाचे डेटा टाईप आहे असे आपण म्हणू कारण बाकीचे जे डेटा टाईप आपण बघितले त्यांना आपण फक्त एक व्हॅल्यु assign करू शकतो परंतु object डेटा टाईप सोबत आपण एकापेक्षा जास्त व्हॅल्यु assign करू शकतो.
Ex :
syntax: let object_name = {
key_name : value,
…
}
ex: let students = {
name : ‘John’,
age: ’20’
}
७)functions: JavaScript functions हा देखील एक प्रकारे डेटा टाईप मानला जातो, कारण JavaScript functions लिहून आपण डेटा मॅनेज करतो.
८)Arrays: एका सिंगल व्हेरिएबल मध्ये जर आपल्याला एका पेक्षा जास्त व्हॅल्यु स्टोअर करायच्या असतील तर आपण Array हा डेटा टाईप वापरतो.
Ex: let courses = [“HTML”, “CSS”, “JavaScript”, “Angular”];
२) What is the use of the isNaN function?
JavaScript मध्ये आपल्याला जर दिलेले इनपुट किंवा व्हॅल्यु नंबर आहे किंवा नाही हे ज्यावेळेस बघायचे असते त्यावेळेस आपण isNaN हे जावास्क्रिप्ट ने स्वतः इनबिल्ट दिलेले फंक्शन वापरू शकतो. इथे NaN म्हणजे नॉट ए नंबर (Not a Number). जेव्हा आपण isNaN() वापरतो त्यावेळेस ते आपल्याला True किंवा false मध्ये आउटपुट देते.
example: १) isNaN(“lastminutelearning”) ह्याचे उत्तर True राहील कारण “lastminutelearning” हि एक string आहे नंबर नाही
२) isNaN(101) ह्याचे उत्तर False राहील कारण 101 हा एक नंबर आहे.
३) What are all the looping structures in JavaScript ?
सर्वात अगोदर looping म्हणजे काय ते बघूया – ज्या वेळेस आपल्याला मोठ्या प्रमाणात डेटा हॅन्डल करायचा असतो किंवा एकाच ऍक्शन खूपदा रिपीट करायची असते त्यावेळेस त्यासाठी लागणारा वेळ आणि कोड रिपीट होऊ नये ह्या साठी आपण looping हि कन्सेप्ट वापरतो. looping म्हणजे आपण प्रोग्राम मध्ये काही कंडिशन ऍड करून आपला कोड आपल्याला हवे ते आउटपुट मिळे पर्यंत रन करतो. ह्यासाठी javaScript मध्ये looping साठी काही टाईप ऍड करण्यात आले आहे.
a) while loop: while loop मध्ये आपण boolean कंडिशन ऍड करतो जो पर्यंत हि कंडिशन मॅच होते तो पर्यंत while loop रन होत असतो.
Syntax: while (condition) {
//Code block to be executed
}
Example:
let count = 1;
while (count <= 5) {
console.log(count);
count++;
}
आउटपुट:
1
2
3
4
5
b) for loop: for loop हा looping टाईप वापरून आपण आपल्याला हवे ते आउटपुट मिळवु शकतो, for loop मध्ये तुम्हाला एक व्हॅल्यु initialize करावी लागते, त्यानंतर एक कंडिशन ऍड करून, तुम्हाला व्हेरिएबल increment किंवा decrement करावी लागते. ह्या कंडिशन नुसार ठरते कि तुमचा फॉर लूप किती वेळेस रन होणार आहे.
example:
for (var n = 2; n <= 4; n++) {
console.log("Value of n:" + n);
}
आउटपुट:
Value of n:2
Value of n:3
Value of n:4
c) do while: do … while हे स्टेटमेंट वापरून देखील आपण आपल्या function मध्ये looping करू शकतो, do while वापरून आपण आपला लूपिंग कोड किमान एकदा तरी execute करू शकतो. do वापरून आपण लूपिंग कंट्रोल करू शकतो do स्टेटमेंट while कंडिशन मॅच होईपर्यंत रन करेल.
example :
let num = 1;
do {
console.log(num);
num++;
} while(num<=5)
आउटपुट:
1
2
3
4
5
४) How can we create an object in JavaScript?
: जावास्क्रिप्ट हे object डेटा टाईपला सपोर्ट करते, object चा उपयोग करून आपण एकापेक्षा जास्त रेकॉर्ड एकाच व्हेरिएबल मध्ये स्टोअर करू शकतो, मोठ्या प्रमाणात डेटा आपण object deta टाईप वापरून हॅन्डल करू शकतो.
Example:
var student = {
name: "Shambhu",
age: 19
};
५) What is the difference between the operators ‘==‘ & ‘===‘?
जावास्क्रिप्ट मध्ये आपण ज्यावेळेस दोन व्हॅल्यु एखाद्या कंडिशन मध्ये तुलना करतो त्यावेळेस == किंवा === हे ऑपरेटर आपण वापरतो. == हे ऑपरेटर जर आपण वापरले तर ते समोरील फक्त व्हॅल्यु मॅच होते किंवा नाही हे चेक करते.
ex: if(3 == '3'){
// code to execute
}
इथे एक व्हॅल्यु 3 आहे म्हणजे नंबर आहे आणि दुसरी व्हॅल्यु जिच्यासोबत आपण तुलना करतोय ती ‘3’ जी सिंगल कोट मध्ये आहे म्हणजे ती स्ट्रिंग आहे. आपण == वापरले आहे हे फक्त व्हॅल्यु मॅच होते कि नाही एवढंच चेक करते. इथे 3 == ‘3’ हि कंडिशन true रिटर्न करेल.
आता आपण === ऑपरेटर बद्दल बघूया, हे ऑपरेटर व्हॅल्यु सोबतच त्याचा डेटा टाईप पण चेक करते.
ex: if(3 === '3'){
// code to execute
}
इथे हि if कंडिशन false रिटर्न करेल कारण === ऑपरेटर व्हॅल्यु आणि डेटाटाइप पण मॅच होतोय कि नाही हे चेक करते. उदाहरणामध्ये 3 हा नंबर आहे व ‘3’ हि स्ट्रिंग आहे त्यामुळे नंबर व स्ट्रिंग वेगवेगळे आहे म्हणून हि if कंडिशन false रिटर्न करेल.
1 thought on “JavaScript top interview questions and answer in marathi | मुलाखतीसाठी javaScript चे काही महत्वाचे प्रश्न आणि उत्तर मराठीमध्ये… 2024”