lastminutelearnings JavaScript (JavaScript in marathi 2024) Explain difference between var, let and const in javascript? । var, let and const मधील फरक सांगा?

(JavaScript in marathi 2024) Explain difference between var, let and const in javascript? । var, let and const मधील फरक सांगा?

(JavaScript in marathi 2024) Explain difference between var, let and const in javascript? । var, let and const मधील फरक सांगा? post thumbnail image

(Learn JavaScript in marathi) Engineering, Bca, Bcs किंवा Mca, Mcs पूर्ण झाल्यानंतर सर्वांना हवा असतो तो जॉब, आणि त्यात जर तुम्हाला वेब डेव्हलपर बनायचं असेल तर पहिली पायरी म्हणजे तुम्हाला Html, Css आणि JavaScript आलेच पाहिजे. आपण lastminutelearnings.com ह्या वेबसाईट वर इंटरव्हिव मध्ये जे काही कॉमन प्रश्न किंवा कंसेप्ट्स विचारल्या जातात त्याची सखोल माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. lastminutelearnings.com ह्या वेबसाईटवर आम्ही Technical गोष्टी मराठीत सांगत आहोत कारण आमची इच्छा आहे कि ग्रामीण भागातील विद्यार्थी तसेच इतर विद्यार्थी ज्यांना Technical Concepts जर मातृभाषेत समजल्या तर ते मुलाखत चांगल्या प्रकारे देऊ शकतात. सोबतच मातृभाषेत काही अवघड गोष्टी देखील सहज समजतात. जर तुम्हाला एखादी गोष्ट चांगली समजली असेल तरचं तुम्ही मुलाखतीमध्ये इंग्रजी भाषेत मुलाखत घेणाऱ्याला सहज समजावून सांगू शकता. तुम्हाला समजल्यानंतर तुम्ही वेबसाईट वर उत्तर इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट देखील करू शकता म्हणजे मुलाखती साठी किंवा कोणत्याही परीक्षेसाठी तुमची तयारी चांगली होईल. JavaScript in marathi असल्यामुळे तुम्हाला समजण्यासाठी नक्कीच मदत होईल.

तुम्हाला Frontend Developer साठी मुलाखत देत असताना var, let and const मधील फरक सांगा हा प्रश्न जवळपास ९९% वेळेस विचारला जाणार आहे, अगदी तुम्ही फ्रेशर असाल किंवा अनुभवी असाल तरी देखील हा प्रश्न विचारला जातोच.

var, let, and const हे जावास्क्रिप्ट ह्या भाषेतील किवर्ड्स आहेत, ज्यांचा वापर करून आपण जे व्हेरिएबल प्रोग्राम मध्ये वापरतो त्याचा स्कोप आणि तो काम कसे करेल हे ठरते. var किवर्ड वापरून जर आपण एखादे व्हेरिएबल लिहले तर आपण तो व्हेरिएबल त्या संपूर्ण फंक्शनमध्ये वापरू शकतो. परंतु let आणि Const किवर्ड वापरून आपण एखादे व्हेरिएबल जर लिहले तर तो व्हेरिएबल आपण एका ठराविक स्कोप पुरताच वापरू शकतो.

आपण var, let and const बद्दल अधिक विस्तृत माहिती बघूया (JavaScript in marathi):
JavaScript in marathi
credit: google
1) var keyword:

var किवर्ड हे जावास्क्रिप्ट प्रोग्रामिंग मधील सर्वात जुने किवर्ड आहे. var किवर्डला ग्लोबल स्कोप आहे म्हणजे var किवर्ड वापरून व्हेरिएबल जर तुम्ही फंक्शनच्या बाहेर जरी लिहला तर तो फंक्शनच्या आत देखील वापरता येऊ शकतो. तसेच फंक्शनच्या आत जर तुम्ही व्हेरिएबल डिफाइन केले तर तुम्हाला त्या फंक्शनमध्ये ते व्हेरिएबल कुठे पण वापरता येऊ शकते.

Example:
var p  = 2;
function checkScope() {
    var q = 20;
    console.log(p, q)
}
checkScope();
console.log(p);

var किवर्ड बद्दल मुलाखतीसाठी खालील मुद्दे लक्षात ठेवा:
१) var किवर्डचा स्कोप हा ग्लोबल किंवा फंक्शन इतका आहे.
२) var किवर्ड वापरून तुम्ही जो व्हेरिएबल डिफाइन कराल त्याची व्हॅल्यु तुम्ही अपडेट किंवा पुन्हा नवीन व्हॅल्यु त्या व्हेरिएबलला किवर्डच्या स्कोपच्या आत देऊ शकता
३) var किवर्ड वापरून तुम्ही जो व्हेरिएबल डिफाइन कराल तो तुम्ही कोणतीही व्हॅल्यु न देता वापरू शकता.
४) तुम्ही कोणतीही व्हॅल्यु न देता व्हेरिएबल ऍक्सेस करू शकता, त्याची डिफॉल्ट व्हॅल्यू ‘Undefined’ राहील.
५) var किवर्ड वापरून डिफाइने केलेले व्हेरिएबल हे ‘Hoisted’ असतात.

What is Hoisting?

Hoisting हि जावास्क्रिप्ट मधील एक फिचर आहे ज्यामुळे तुम्ही व्हेरिएबल डिफाइन न करता देखील वापरू शकता. म्हणजेच जेव्हा जावास्क्रिप्टचा प्रोग्राम रन होतो त्यावेळेस तुम्ही जर एखादे व्हेरिएबल प्रोग्रामच्या शेवटी जरी लिहले तरी ते सर्वात अगोदर एक्सिक्युट होते, ह्या फिचरला होईस्टिंग ‘Hoisting’ म्हणून ओळखले जाते.

Example:        

// use score variable before declaring
console.log(score);

// declare and initialize score variable
var score = 5;

// Output: undefined
2) let keyword:

let किवर्डला ब्लॉक स्कोप आहे म्हणजेच तुम्ही let किवर्ड वापरून जेव्हा एखादे व्हेरिएबल लिहता त्यावेळेस त्याचा वापर एका ठराविक भागापर्यंतच करता येऊ शकतो. तुम्हाला उदाहरणामध्ये ते चांगले समजेल.

Example: 
{
    let number = 20;
    // calling the function inside block
    console.log(number)
}

// Calling a function outside
// block throws an Error
console.log(number);

let किवर्ड बद्दल मुलाखतीसाठी खालील मुद्दे लक्षात ठेवा:
१) let किवर्डला ब्लॉक स्कोप आहे
२) let किवर्ड असलेल्या व्हेरिएबलची व्हॅल्यु त्याच्या स्कोप मध्ये अपडेट करता येते परंतु पुनः डिक्लेअर करता येत नाही
३) ह्या प्रकारचे व्हेरिएबल कोणतीही व्हॅल्यु न देता डिक्लेअर करता येते
४) परंतु हे व्हेरिएबल त्याला काहीतरी व्हॅल्यु दिल्याशिवाय ऍक्सेस करता येत नाही, असे केल्यास ते ‘referenceError’ देते
५) हे व्हेरिएबल देखील होइस्टेड असतात परंतु ते जो पर्यंत व्हेरिएबलला व्हॅल्यु इनिशिअलाइज करत नाही तो पर्यंत ‘temporal dead zone’ मध्ये असतात.

3) const keyword:

const आणि let मध्ये बऱ्यापैकी साम्य आढळते कारण दोन्ही प्रकारातील व्हेरिएबलला ब्लॉक स्कोप आहे, परंतु const किवर्डला आपण अपडेट किंवा पुन्हा डिक्लेअर करू शकत नाही.

const n = 10;
function checkConst() {
    n = 9
    console.log(n)
}
checkConst();    

o/p: TypeError:Assignment to constant variable.

Const किवर्ड बद्दल मुलाखतीसाठी खालील मुद्दे लक्षात ठेवा:
१) const किवर्डला ब्लॉक स्कोप आहे
२) const किवर्ड असलेल्या व्हेरिएबलची व्हॅल्यु अपडेट तसेच पुनः डिक्लेअर करता येत नाही
३) ह्या प्रकारचे व्हेरिएबल व्हॅल्यु न देता डिक्लेअर करता येत नाही.
४) const किवर्ड असलेले व्हेरिएबल त्याला काहीतरी व्हॅल्यु दिल्याशिवाय डिक्लेअर तसेच ऍक्सेस करता येत नाही.
५) हे व्हेरिएबल देखील होइस्टेड असतात परंतु ते जो पर्यंत व्हेरिएबलला व्हॅल्यु इनिशिअलाइज करत नाही तो पर्यंत ‘temporal dead zone’ मध्ये असतात

Share with your friends

1 thought on “(JavaScript in marathi 2024) Explain difference between var, let and const in javascript? । var, let and const मधील फरक सांगा?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

javascript string methods with examples

javascript string methods with examples | JavaScript predefined methods in marathi | top used methods and easy to understand | Js methods with example 2024.javascript string methods with examples | JavaScript predefined methods in marathi | top used methods and easy to understand | Js methods with example 2024.

Lets See javascript string methods with examples, explained in marathi and easy language javascript string methods with examples 1) charAt(): string मधून specified index (position) मधील character return करण्यासाठी आपण